राजमुद्रा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच काउंटडाऊन सुरू झाल असून निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.. दरम्यान विधानसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ठरलेल्या लढतींपैकी एक लढत म्हणजे, शिवडी विधानसभा मतदारसंघाची लढत. या मतदारसंघातून ठाकरेंनी त्यांच्या पडत्या काळात त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेल्या विद्यमान आमदार अजय चौधरींना (Ajay Chaudhari) निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर, मनसेकडून माजी आमदार बाळा नांदगावकरांना (Bala Nandgaonkar) तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे शिवडीचा गड कोण राखणार हे उद्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे..
शिवडी मतदार संघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवडीचा गड सर करणारा आणि सलग दोन टर्म आमदारकी मिळवलेला आपला हुकुमी एक्का बाळा नांदगावकरांना रणांगणात उतरवलं आहे. अशातच महायुती कोणता डाव खेळणार? शिवडीतून कुणाला तिकीट देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मात्र, महायुतीनं एक पाऊल मागे टाकत आपला डाव खेळला आणि आपली संपूर्ण ताकद बाळा नांदगावकरांच्या पाठिशी उभी केली. महायुतीनं आपला उमेदवार न देता, बाळा नांदगावकरांना जाहीर पाठिंबा दिला.. मात्र आता या जनतेचा कौल कोणाला असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..
या मतदारसंघात अजय चौधरी मनसे आणि महायुतीच्या ताकदीवर भारी पडणार का? आणि उद्धव ठाकरे शिवडीवरचं आपलं पारंपरिक वर्चस्व कायम राखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.