राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे ते उद्याच्या निकालाकडे.. निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना आमची सत्ता येणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेतेही करत आहेत.. अशातच या निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे मतांचा टाका वाढल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला आहे..आता या लाडक्या बहिणींचा कौल कोणाला असणार हे उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे..
महाराष्ट्रात एकूण मतदार ९ कोटी ५३ लाख होते. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही ४ कोटी ९३ लाख तर महिला ४ कोटी ६० लाख मतदार आहेत. महाराष्ट्रात एकूण मतदान हे ६२. ०२ टक्के इतकं झालं आहे. म्हणजेच ६ कोटी २१ लाख मतदारांनी मतदान केलं. २०१९ मध्ये ६१. ४ टक्के मतदान झालं होतं म्हणजेच यंदा ३. ६ टक्क्यांनी मतदान वाढलं आहे. ही वाढलेला मतदान लाडक्या बहिणींचा असल्याच बोललं जात आहे.. महाराष्ट्रात मतांची टक्केवारी वाढली असून निकालानंतर स्पष्ट होईल की आमचं सरकार येणार असा दावा महायुतीतीच्या नेत्यांच्याकडून केला जात आहे..
विधानसभा निवडणुकीच्या ४ महिन्यांपूर्वीच सरकारने लाडकी बहीण योजना आणली. चार महिन्यांचे साडे सात हजार रूपये अडीच कोटी महिलांच्या खात्यात टाकले. सरकारचा प्रचार लाडक्या बहिणीवरूनच केंद्रीत झाला होता. तर सरकारमध्ये आल्यावर १५०० रूपयांचे २१०० रूपये करणार अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. जसा २१०० रूपयांचा वायदा महायुतीने केला होता तसाच वायदा महाविकास आघाडीने केला असून महालक्ष्मी योजनेद्वारे महिन्याला ३००० रूपये देण्याचा केला. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी पसंती आधीच्या भावांना दिली की नवा वायदा करणाऱ्यांना दिली. हे निकालानंतरच समोर येणार आहे.