राजमुद्रा : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले असताना शनिवारी सकाळी आठ वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल.. अशातच आता खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.. या मतदारसंघात शरद पवार गटविरुद्ध शिवसेना शिंदे गट आमने-सामने आहेत.त्यामुळे रोहिणी खडसे यांच्या बालेकिल्ल्यात आता शिंदे गटाचे चंद्रकात पाटील बाजी मारणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघात खडसेना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीतर्फे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे रिंगणात होत्या.. या मतदारसंघात पूर्वीपासून एकनाथ खडसे यांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.. मात्र या विधानसभा निकालानंतर आता या मतदारसंघात शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांचे पारड जड असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..
दरम्यान रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष देखील आहेत.. या निवडणुकीच्या निकालानंतर मुक्ताईनगर येथे पराभवला सामोरे जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.. या मतदारसंघात एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील बाजी मारणार असल्याचे बोलल जात आहे.. त्यामुळे या मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा पराभव होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..