राजमुद्रा : नुकतंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडलं.. या मतदानानंतर राज्यभरात विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले. यामध्ये महायुतीला बहुमत मिळणार असून राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला आहे.. एक्झिट पोलची ऐशी की तैशी असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.. तसेच इथे 26 नोव्हेंबरला आमचं सरकार बनवणार असा ठाम दावा संजय राऊत यांनी केला आहे..
यावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीतील सर्व जण एकत्र बसलो. महाराष्ट्रातील निवडणुका, मतदान, कौल सर्वांचा अंदाज घेतला. अनिल देसाई, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील यांच्यासह सर्व नेते मंडळी एकत्र आलो. प्रत्येक जागाचं गणित मांडल्यानंतर असं लक्षात आलं की, आम्ही 160 जागांवर सहज निवडून येऊ असं स्पष्ट झालं, असा दावा त्यांनी केला. हे सर्व्हे आणि एक्झिट पोल कोणी केले? असा सवाल करत यावर आमचा विश्वास नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यासोबतच आम्ही 26 नोव्हेंबरला सरकार बनवणार आहोत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.
दरम्यान दुसरीकडे महायुतीचे सरकार अपक्षांना लोणी का लावत आहेत असा सवाल ही त्यांनी उपस्थित करत महायुतीवर गंभीर आरोप केला आहे.. विधानसभा निकालानंतर महायुतीचे सरकार येणार असल्याचा दावा त्यांचे नेते करत आहेत मग तरी त्यांचा बहुमताचा आकडा जास्त असेल तर ते अपक्षांकडे का बोलणी करत असल्याचा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.. आता विधानभेच्या निकालानंतरच राज्यात महायुती की महाविकास आघाडीचे सरकार असणार हे स्पष्ट होणार आहे..