रावेर राजमुद्रा वृत्तसेवा (जयंत भागवत) रावेर पुरवठा विभागाचा कथित गैरव्यवहाराचा कारभार बाहेर आल्यानंतर आता लवकरच या सर्व प्रकरणाची चौकशी पूर्ण होणार आहे. तसेच चौकशी अहवाल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढत चालले आहे.
रावेर पुरवठा विभागाचा मनमानी कारभार बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तत्कालीन पुरवठा निरिक्षक यांना जबाबदार धरून दि १० मे रोजी तडका-फडकी बदली केली होती. या प्रकरणाची मागील दोन महिन्यां पासुन चौकशी सुरु असून लवकरच या प्रकरणाची चौकशी आता पूर्ण होणार आहेत.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी फैजपुरचे प्रांतधिकारी कैलास कडलक यांच्याकडे दिली असून, या प्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण होणार आहे. दरम्यान, रावेर पुरवठा विभागात शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड ३ रुपये प्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे यासह इतर कारणांवरुन संबंधितांची बदली करण्यात आली होती. तेव्हा पासुन चौकशी सुरु आहे.