राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिला आहे ते आजच्या निकालाकडे.. आज सकाळपासून पोस्टल मतदानाला सुरुवात झाली असून पहिला कल भाजपच्या बाजूनं लागला आहे, तर दुसरा कल काँग्रेसच्या बाजूनं लागला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुती 123 तर महाविकास आघाडीचे 100 उमेदवार आघाडीवर आहेत तर इतर उमेदवार आघाडीत आहेत..
सकाळी ८.४५ पर्यंत मिळालेल्या कलानुसार भाजपने ८० जागांवर आघाडी घेतली आहे. महायुतीमधील शिवसेना २४ आणि राष्ट्रवादीला १८ जागा मिळताना दिसत आहे. महायुतीने २३३ जागांपैकी 123 जागांवर आघाडी घेतली आहे.
महाविकास आघाडीची राज्यात पिछाडी होत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. काँग्रेस ४१ जागांवर आघाडीवर आहे. २८ जागांवर ठाकरे गट तर ३१ जागांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे.
बारामतीमध्ये पोस्टल मतांमध्ये अजित पवार पिछाडीवर होते. परंतु आता त्यांनी आघाडी घेतली आहे. येवलामध्ये छगन भुजबळ यांनी आघाडी घेतली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधून आघाडी घेतली आहे.
सोलापूर दक्षिणमधून पोस्टर मतमोजणीत भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर आहेत तर ठाकरे गटाचे अमर पाटील पिछाडीवर आहेत.