राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू येत असून जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे गिरीश महाजन यांनी सरशी मारली आहे.. ते ११५८१ मतांनी आघाडीवर आहेत..
जामनेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सातव्यांदा महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत.. महाजन यांच्या विरोधात या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे रिंगणात आहेत.. या मतदारसंघाची आजवरची ही सर्वात चुरशीची प्रतिष्ठेची आणि सस्पेन्स ठेवणारी निवडणूक ठरली आहे..
या मतदारसंघात गिरीश महाजन आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवणार की शरद पवारांची पॉवर काम करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..