राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचीच आघाडी असल्याचे चित्र दिसून येत आहे.. या निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील 11 ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचच पारडं जड असून महाविकास आघाडीला चांगलाच दणका बसला आहे.. जळगाव जिल्ह्यातील 11 ही जागावर महायुतीनेच आघाडी घेतली आहे.. जाणून घेऊया विजयी उमेदवारांची यादी
राजुमामा भोळे – जळगाव शहर
गिरीश महाजन – जामनेर
गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण
संजय सावकारे – भुसावळ
अमोल जावळे – रावेर
अनिल पाटील – अमळनेर
मंगेश चव्हाण – चाळीसगाव
किशोर पाटील – पाचोरा
अमोल पाटील – पारोळा
चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर
चंद्रकांत सोनवणे – चोपडा
या जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी सहा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचे दिसून आले.. मात्र आजच्या निकालानंतर संपूर्ण जिल्हा भगवामय झाला असून महायुतीनेच गड राखला आहे.. या सर्व मतदारसंघात काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी (SP ) शून्य जागा आहेत..
जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात झालेल्या प्रमुख लढती जाणून घेऊया…
जळगाव शहर मतदार संघ –
जळगाव शहर मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे रिंगणात होते.. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या उबाटा गटाच्या जयश्री महाजन रिंगणात होत्या.. तर कुलभूषण पाटील आणि मनसे डॉ. अनुज पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे कुलभूषण पाटील हे अपक्ष रिंगणात आहेत. या मतदारसंघात भाजपाने मुसंडी मारली असून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांचा विजय झाला आहे..
जामनेर मतदार संघ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे गिरीश महाजन यांनी सरशी मारली आहे..
या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सातव्यांदा महायुतीकडून निवडणूक लढवत होते.. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे रिंगणात होते.. या मतदारसंघाची आजवरची ही सर्वात चुरशीची प्रतिष्ठेची आणि सस्पेन्स होणारी निवडणूक ठरली.. या मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली असून गिरीश महाजन आघाडीवर आहेत..
जळगाव ग्रामीण मतदार संघ
जळगाव जिल्ह्यातील किंबहुना उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची लढत म्हणून बघितले जाणाऱ्या जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षविरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना अशी लढत रंगली.. या जळगाव ग्रामीण मतदार संघात महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील विरोधात महाविकास आघाडीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात होते..गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीणचा गड राखत आज बाजी मारली आहे..
अमळनेर मतदार संघ
या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ अनिल शिंदे, त्याचबरोबर भाजपचे बंडखोर नेते अपक्ष शिरीष चौधरी रिंगणात होते.. या मतदारसंघात अनिल पाटील यांनी बाजी मारली आहे..
पाचोरा मतदार संघ
महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरुद्ध त्यांच्या भगिनी शिवसेना (उबाठा) वैशाली सूर्यवंशी, बंडखोर दिलीप वाघ, अमोल शिंदे यांच्यात चौरंगी लढत होती. आजचा निकालानंतर या मतदारसंघात किशोर पाटील यांनी मुसंडी मारली आहे..
एरंडोल विधानसभा मतदारसंघ
एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अमोल चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) डॉ सतीश पाटील रिंगणात असतील. तर या निवडणुकीत शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख हर्षल माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. संभाजी पाटील, भाजपाचे माजी खासदार एटी नाना पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमित पाटील हे अपक्ष म्हणून उतरले होते.. आजच्या निकालानंतर या मतदारसंघात अमोल पाटील यांनी बाजी मारली आहे..
चोपडा विधानसभा मतदारसंघ
चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांच्या विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) प्रभाकर सोनवणे यांच्यात लढत झाली.. आज आलेल्या निकालानंतर चंद्रकांत सोनवणे यांनी बाजी मारली आहे..
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
हा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केल्याचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. आता चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार उन्मेष पाटील यांच्यात थेट लढत पार पडली. या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचा मंगेश चव्हाण यांनीच गड राखला आहे..
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडी तर्फे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध अपक्ष विनोद सोनवणे यांच्यात लढत झाली.. आज या मतदारसंघात शिवसेनेने बाजी मारली असून चंद्रकांत पाटील यांनी मुसंडी मारली आहे…
भुसावळ विधानसभा मतदारसंघ
जळगाव जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघाची चर्चा आहे. कारण भुसावळमध्ये भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे राजेश मानवतकर यांच्यात थेट लढत झाली.. या मतदारसंघात संजय सावकारे यांनी बाजी मारली..
रावेर विधानसभा मतदारसंघ
रावेर मतदारसंघ भाजपाचे हरिभाऊ जावडे यांचे पुत्र अमोल जावळे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे धनंजय चौधरी, तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी, वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील, काँग्रेसचे (अपक्ष म्हणून लढणार) दारा मोहम्मद अशी लढत होती.. या मतदारसंघात अमोल जावळे यांनी बाजी मारली आहे.