राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सर्व मतदारसंघात महायुतीचे अधिक वर्चस्व दिसून आले.. या निकालानंतर आता मुंबई कोणत्या शिवसेनेचे असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं होतं.. मुंबई भागात विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत त्यापैकी काही ठिकाणी शिवसेना(शिंदे )विरुद्ध शिवसेना (ठाकरें)अशी लढत झाली तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध ठाकरे अशी लढत झाली. मात्र या मतदारसंघात भाजपचे अधिक वर्चस्व दिसून आले.मुंबईतील ३६ जागांपैकी १९ जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांचे १५ उमेदवार विजयी झाले आहेत..
मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी २२ जागा लढवल्या होत्या. त्यात १० जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १४ जागी उमेदवार दिले होते. त्यांना ६ ठिकाणी यश आले. काँग्रेसला तीन, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक आणि समाजवादी पक्षाला एक जागा मिळाली. राज ठाकरे यांच्या मनसेला एकही जागा मिळाली नाही.आता मुंबईत नेमकी कोणाची ताकद सर्वाधिक आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. या मुंबईत भाजपची स्थापना सर्वाधिक असल्याचे दिसून आला आहे..
भाजपचे विजयी उमेदवार –
कुलाबा -राहूल नार्वेकर
मलबार हिल-मंगलप्रभात लोढा
वडाळा-कालीदास कोळंबकर
सायन कोळीवाडा -तमिळ सेल्वन
बोरीवली-संजय उपाध्याय
दहीसर-मनिषा चौधरी
कांदिवली-अतुल भातखळकर
चारकोप-योगेश सागर
गोरेगांव-विद्या ठाकूर
अंधेरी पूर्व-अमित साटम
मुलुंड-मिहिर कोटेचा
घाटकोपर पश्चिम-राम कदम
घाटकोपर पूर्व-पराग शहा
विलेपार्ले-पराग अळवणी
वांद्रे पश्चिम-आशिष शेलार