राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचे दिसून आल आहे. तब्बल 132 जागावर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या भाजपा नंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष दुसरा या पक्षाला 57 जागावर विजय मिळाला तर अजित पवार असा तिसरा पक्ष याला 41 जागावर विजय मिळाला. या विधानसभेत तिन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या वाढली असून मंत्रिपदासाठी महायुती जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.. महायुतीत भाजप सह शिंदे आणि अजितदादांच्या वाट्याला किती किती मंत्रीपद येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा फॉर्मुला 21, 12, 10 असल्याची माहिती समोर आली आहे..
सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार पाच ते सहा आमदारांमध्ये एक मंत्रिमंद असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली असून भाजपचे 132 आमदार निवडून आल्याने भाजपचा सर्वाधिक वाटा असू शकतो.. या मंत्रिमंडळात भाजपचे 22 ते 24 मंत्री असू शकतात शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार आल्यामुळे त्यांचे 12 ते 13 मंत्री असू शकतात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार असल्यामुळे त्यांच्या वाट्याला 9 ते 10 मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीमध्ये विधानसभेच्या निकालानंतर 230 आमदारांचा संख्याबळ वाढला आहे.. या मंत्रिमंडळामध्ये भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आशिष शेलार हे कॅबिनेट मंत्री होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात असून यासोबत प्रवीण दरेकर,रवींद्र चव्हाण, राहुल कुल,मंगल प्रभात लोंढा,संभाजी निलगेकर आणि गणेश नाईक हे सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत त्यामुळे राज्यमंत्रीपद कोणाला होऊ शकतो? कोणाशी वर्णी लावू शकते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..