राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.. हा पराभव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चांगलाचं जिव्हारी लागला असून त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर समाधान मानावे लागले.. निवडणुकीत काँग्रेसचे फक्त 16 जागावरच उमेदवार निवडून आले असल्याने काँग्रेसवर मोठी नामुश्कि ओढावली. आता या पराभवानंतरच नाना पटोले यांनी मोठे पाऊल उचलत आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.. नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले असून त्यांनी 24 नोव्हेंबरला काँग्रेसच्या हाय कमांड यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.. या भेटीत त्यांनी राजीनामा सुपूर्द केला असल्याचा समोर आला असून तो राजीनामा अद्यापही हाय कमाडाने स्वीकारलेला नाही. त्यामुळे नाना पटोले यांचे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला आहे.. यामध्ये भाजप 132,शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या..या निवडणुकीत महाविकास आघाडीचा साफ सुपडा झाला असून आता या आघाडीतील नेते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत.. या निवडणुकीत अनेक दिग्दज नेत्यांचा पराभव झाला असून पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर,बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे हे पराभूत झाले..त्यामुळे या पराभवाची नैति जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..