राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय मिळाला या विजयाचा श्रेय लाडक्या बहिणींना दिले जातय.. आता या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी सरकारने सुरू केली असून नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पहिला निर्णय लाडक्या बहिणींना निधी वाढवण्याचा असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. डिसेंबर महिन्यापासूनच त्यांना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील 2.34 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये सरकारतर्फे दिले जात आहे. ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. आता लवकरच सरकार सपने नंतर डिसेंबर महिन्यापासून त्यांना या महायुतीच्या भावांकडून रिटर्न गिफ्ट मिळणार आहे..राज्यभरातील 13 लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. या महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे प्रलंबित होते. परंतु आता त्यांचे अर्ज मंजूर करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीत लाडक्या बहिणांना महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहे. परंतु महिन्याला 2,100 रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे. त्यासाठी नवीन सरकारला आता हालचाली कराव्या लागणार आहे. नवीन सरकाच्या स्थापनेनंतर पहिला निर्णय लाडक्या बहिणांना निधी वाढवण्याचा असू शकतो.