राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या गोत्यात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून भाजपचे नेते- कार्यकर्ते यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पहिली पसंती मिळत आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत देवेंद्र फडणवीसांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत असून आता नवनिर्वाचित पाच अपक्ष आमदारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. या पाच नवनिर्वाचित अपक्ष आमदारांमध्ये रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटील यांचा पाठिंबा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले आहेत.
दरम्यान महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या २ फॉर्म्युल्यावर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला असा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर 2-2-1 म्हणजेच या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल. या फॉर्म्युलासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे..