जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर तालुक्यातील पहूर येथे बारामती येथील धनगर समाजातल्या लढाऊ नेत्या कल्याणी वाघमोडे यांनी जागर यात्रा निमित्त तालुक्यातील धनगर समाज बांधवांची बैठक झाली.
या बैठकीत वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ओबीसींचे स्थानिक स्वराज्य मधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरून धोक्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी उठाव पाहायला मिळत आहे. ओबीसी संदर्भात बोलताना कल्याणी वाघमोडे म्हणाल्या, ‘सर्व ओबीसी संघटनांकडून न्याय मिळण्यासाठी आंदोलन मोर्चे काढले जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.’ असे सांगून त्या म्हणाल्या, ओबीसी आरक्षणाचे फक्त राजकारण सत्ताधारी व विरोधी पक्षांनी करू नये. अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे धनगर आरक्षण बाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. दुरुस्ती अहवाल केंद्र सरकारला सुपूर्त करावा आणि केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात केलेल्या वक्तव्याला जागले पाहिजे. असेही कल्याणी वाघमोडे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आरक्षणासंबंधी असलेल्या विविध मागण्यांचा उहापोह केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, रामेश्वर पाटील, मुख्याध्यापक राजू पाटील, शेतकरी संघाचे साहेबराव देशमुख, राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश पाटील, किरण पाटील, डॉ. प्रशांत पांढरे, विजय पांढरे, अमोल पाटील, विष्णू पांढरे, विशाल पाटील, गंगाधर पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश पांढरे यांनी तर आभार एस आर पाटील यांनी केले.
दरम्यान धनगर समाजाची बैठक पारधी येथील राजगड हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या हॉलमध्ये घेण्यात आली या बैठकीला उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील डॉक्टर उज्वला पाटील कमलाकर पाटील लता सुशील उमेश कचरे संदीप धनगर दत्ता धनगर आदी उपस्थित होते