राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.. अशातच विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.. मात्र त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर दावा केला असून भाजपकडून आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला जात आहे..या घडामोडीतच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्लीत केंद्रीय मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचे स्पष्ट झालं.. आता या निकालानंतर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद दिले जावं असं म्हटलं जात आहे. भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित केले आहे. आमच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजपने एकनाथ शिंदेना दिला आहे.दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे. त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे..
दरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत देवेंद्र फडणवीसांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत असून आता नवनिर्वाचित पाच अपक्ष आमदारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. या पाच नवनिर्वाचित अपक्ष आमदारांमध्ये रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटील यांचा पाठिंबा आहे. आता मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार असल्याच दिसून येत आहे.