राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाल तर महाविकास आघाडीला मोठा दारूण पराभवाला सामोरे जाव लागल… हा विधानसभेचा पराभव विरुद्धकांच्या चांगला जिव्हारी लागला असून त्या विरोधात आवाज उठवण्याची तयारी विरोधकांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. या मागणीनुसार निवडणूक आयोगाने निर्णय घेत मागणी मान्य केली आहे.. त्यामुळे लवकरच या मतदारसंघात पुन्हा मतमोजणी होणार आहे.
विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक आयोगकडे पत्र व्यवहार केला आहे. त्यामुळे आता एकूण असलेल्या बुथ पैकी पाच टक्के बुथवर फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे. फेर मतमोजणीसाठी एक बुथसाठी 40 हजार रुपये शुल्क आणि जीएसटी भरण्याचे पत्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुधाकर बडगुजर यांना दिले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फेरमतमोजणी होण्याची शक्यता आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध ठाकरे अशी लढत झाली.. या लढतीत भाजपच्या सीमा हिरे या विजयी झाल्या होत्या. त्यांना 1 लाख 40 हजार 773 मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला. त्यांना 72 हजार 661 मते मिळाली. मनसेचे दिनकर पाटील यांना 46 हजार 390 मते मिळाली. या निकालावर सुधाकर बडगुजर आणि दिनकर पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पराभवात महाविकास आघाडी ॲक्शन मोडवर आली असून नाशिकच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणी मतमोजणीनंतर पराभूत झालेल्या उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली. त्यामुळे नाशिक सह इतरही मतदारसंघात फेर मतमोजणी केली जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.