राजमुद्रा : महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे.. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातच मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झाल आहे.. असं असलं तरी भाजपने नुकतचं मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या होत्या. या दोन्ही ऑफर त्यांच्याकडून धुडकवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्मुला दिला आहे.यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ते सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही. मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे असा निरोप भाजपच्या वरिष्ठापर्यंत पोहोचला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाऐवजी केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी या दोनही ऑफर धुडकावल्या आहेत. उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील मंत्रिपद एकनाथ शिंदे स्वत: घेणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे..ते फक्त पक्षप्रमुख म्हणून काम पाहणार असल्याचे समोर आलेय. त्याशिवाय राज्यात उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन नावं महायुतीला देणार, त्यामध्ये मागासवर्गीय किंवा मराठा चेहरा असू शकतो, असेही सांगण्यात आलेय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप ४ महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवणार. गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल खाते भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याचीं माहिती समोर आले आहे.. अर्थ खाते सध्या अजित पवार यांच्याकडे आहे, तर नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.दरम्यान आता महायुतीत मुख्यमंत्री पदावरून असणारा वाद मिटणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार नाही. त्यामुळे शिवसेनेकडून गृहमंत्रालयाची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय चांगल्या खात्याचीही शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली आहे.मुख्यमंत्री न मिळाल्यास गृहमंत्रालय मिळणार का? याची चर्चा सुरु झाली.