जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील अक्षया सिटीस्कॅन सेंटर जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संचालकांनी दिली. आकाशवाणी चौकातील विद्या नगर येथे अक्षय सिटीस्कॅन सेंटर सुरू करण्यात आले असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे, आवाहनही करण्यात आले आहे. या प्रसंगी गोपाळ देवकर, विशाल देवकर, प्रफुल्ल देवकर, लिलाधर तायडे, अजय सोनवणे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी, परेश कोल्हे, दिलीप माहेश्वरी, निलेश पाटील, मंगला पाटील, खुशाल चव्हाण, सुजित शिंदे, मोहन पाटील, धनराज माळी, बापू परदेशी, संतोष मेंडके, ढवल पाटील डॉ. नितीन पाटील उपस्थित होते.