राजमुद्रा : नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना महायुतीत मुख्यमंत्री पदावरून जोरदार घमसान सुरू आहे..या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांकडून होत आहे.. तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेनीं ही दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.. या पार्श्वभूमीवर आता भाजपा राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून देवेंद्र फडणवीस यांचा रस्ता मोकळा करावा अस आवाहन त्यांना केलाआहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची सगळ्यांची भावना आहे. आमचा स्ट्राईक रेट जवळपास ९९ आहे. ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्यालाच संधी मिळाली पाहीजे असे भाजपाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी म्हटले आहे. मागे 2019 ला लहान भावाला आम्ही सिंहासनावर बसवलं, आता एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा असे आवाहन भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले आहे, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करत आहोत असेही गोपछडे यांनी म्हटले आहे.
संपूर्ण देशाला माहित आहे कि, देवेंद्र फडणवीस अडचणीच्या काळात धावून जाणारे नेते आहेत, कोरोना असो वा कोणतेही संकट ते अडीअडचणीला धावून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री पदावर दावा असायला पाहीजे त्यांनाच हे पद दिले पाहीजे असेही गोपछडे यांनी म्हटले आहे. दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.. आता त्यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली असून या पत्रकार परिषदेत ते काय भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने 132 जागा जिंकल्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहे.. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच असावेत अशी भाजपच्या नेत्यांचीं आणि कार्यकर्त्यांचीं इच्छा आहे.. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिली आहे..