राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस उलटले तरीही मुख्यमंत्री पदावर अजूनही निर्णय झालेला नाही.. अशातच आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.. यावेळी झालेल्या या बैठकीत ‘महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा’ या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मराठा मुख्यमंत्री द्यायचा का? यावरून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय रखडला आहे का? असा प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. या निकालात भाजपला अधिक मत मिळत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करावा या मागणीने जोर धरला आहे.. मात्र मंत्री अमित शहा आणि भाजपा नेते विनोद तावडे यांच्या झालेल्या बैठकीत मराठा मुख्यमंत्री द्यायचा का यावरून मुख्यमंत्री बाबांचा निर्णय रखडला असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे..कारण राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा नसल्यास, त्याचे काय परिणाम होतील? यावर अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांनी आंदोलन उभारल्यानंतर एकवटलेला मराठा समाज, याचा राज्याच्या मुख्यमंत्री निवडीवर देखील परिणाम झाला असल्याचं सर्वांनी पाहिला आहे.
दरम्यान या भेटीत दोन्ही नेत्यांकडून भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच २०१४ ते २०२४ पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा घेतला आढावा.भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे याबाबत सर्व गणितांची मांडणी केली. आगामी निवडणुका, फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीच्या मतांबाबतही चर्चा केली. या सगळ्या बाबी समजावून घेतल्यानंतर आता मंत्री अमित शहा आणि भाजपचे केंद्रीय नेते राज्यातील मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..