राजमुद्रा : जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुली परिसरात अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर वाहनातील सिलेंडरचा स्फोट होऊन साधनांचा बळी गेला..या प्रकरणी संजय वराडे यांनी रिफिलिंग प्रकरणात पोलिसांकडून वसुली केली जात असल्याचा आरोप केला आहे.. तसेच या प्रकरणी एमआयडीसी ठाण्यातील पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.. यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षणा निवेदन दिला असून चौकशी न केल्यास 7 डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे..
शहरातील इच्छा देवी चौकात झालेल्या सिलेंडर स्फोटात त्या भागातील पोलीस ही जबाबदार असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी संजय वराडे यांनी त्या निवेदनात केली आहे.. या परिसरात असणाऱ्या एमआयडीसी पोलिसांच्या अखत्यारित असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत.. तरीही पोलिसांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही असा आरोप त्यांनी केला आहे.. या भागात महावितरणच्या खांबावरील तार चार वेळा चोरीला गेल्या याबाबत पुरावा देऊनही पोलिसांनी चौकशी केली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.. त्यामुळे आता 7 जणांच्या झालेल्या बळीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे..