राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात राज्यभरात महायुतीची लाड दिसून आली तशीच लाट खानदेशातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात ही पाहायला मिळाली.. या जिल्ह्यातील 20 ही मतदारसंघांमध्ये अनेक आमदारांनी मोठ्या मताधिकांना विजय खेचून आणला.. आता हे आमदार आपल्या मतदारसंघातील युवकांना रोजगार आणि त्यासाठी उद्योग उभारण्याची घोषणा करीत आहेत. त्यामुळे हे उद्योग येणार कुठून? या गंभीर प्रश्नाच ओझे राज्याच्या नेतृत्व करणाऱ्या भाजप पुढ उभ आहे.
खानदेशात ही भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं.. खानदेशातील जळगाव शहरातील आमदार सुरेश भोळे,मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील, शहादा तळोदा येथील आमदार राजेश पाडवी,नवापूर येथील आमदार शिरीष कुमार नाईक, शिरपूर येथील आमदार काशीराम पावरा, शिंदखेडा येथील माजी मंत्री जयकुमार रावल या आमदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघात एमआयडीसी आणणार असल्याच्या घोषणा केल्या आहेत. आता या मतदारसंघातील आमदारांच्या अपेक्षांचे ओझं भाजप पुढे असणार आहे. त्यामुळे भाजप या अपेक्षा पूर्ण करू शकेल का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तरीही अद्याप सरकार स्थापन झालं नाही.. भाजप नेते देवेंद्र फडणवीस लवकरच मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता त्यांच्यापुढे पुढील निवडणुकीसाठी अनेक समस्या आणि अडचणी निर्माण होतील अशी सध्याची परिस्थिती आहे.. सध्याचे आमदारांनी मतदारांना प्रसिद्ध आश्वासने दिली असून ही आश्वासने कशी पूर्ण करणार हा राजकीय प्रश्न सर्वांसमोर आहे..
या नव्या सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रीपद मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.. दरम्यान या नव्या सरकारकडून आमदारांना असणाऱ्या अपेक्षा तसेच आमदारांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनामुळे मतदारांचा भ्रमनिरास होणार का? तसेच आमदारांनी केलेल्या घोषणा त्यांचा आत्मविश्वास पाहता सरकार काम कसे करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.