राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर ही महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलं नाही.. नव्या सरकारच्या सत्ता स्थापन कडे सर्वांचे लक्ष लागून राहिला असताना शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भाजपच टेन्शन वाढल आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेऊ शकतात असं वक्तव्य त्यांनी केल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
विधानसभा निवडणुकीचा कालावधी संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.. त्यानंतर त्या नाराज असल्याच्या चर्चांना जोर धरला. आता येत्या 24 तासात एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार असल्याचे शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी म्हटल आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे हित महाराष्ट्राच्या राजकारणात असल्याने ते केंद्रीय मंत्री मंडळात कोणते पद स्वीकारतील असेही त्यांनी स्पष्ट केल आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार आता ते पाहत असताना त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. सध्या एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी दरेगावात गेल्याने शुक्रवारी होणारी महायुतीची बैठक स्थगित करण्यात आली. आता रविवारी मुंबईत ही बैठक आयोजित केली जाऊ शकते.महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेबद्दला सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी असं म्हटलं आहे की, मुख्यमंत्री शिंदे यांना जेव्हा एखाद्या मोठ्या निर्णयावर विचारविनिमय करायचा असतो तेव्हा ते आपल्या गावी जातात, उद्या संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील असं ते म्हणाले.. दरम्यान दिल्लीत केंद्रीय मंत्री अमिषा यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची बैठक झाली.. बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली
महायुतीत मुख्यमंत्री पदावरून पेच सुरू असताना आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं असून भाजपचं टेन्शन वाढला आहे.