राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने मोठा विजय मिळवला आणि महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं.. या निकालात ईव्हीएम मध्ये मोठा गैरप्रकार असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी एल्गार पुकारत आत्मक्लेष आंदोलन सुरू केला आहे.. आता या आंदोलन स्थळी जाऊन पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आहे.. या भेटीत त्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्यासही सांगितलं आहे.. शरद पवार यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार यश मिळवलं मात्र महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला.. या पराभव नंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय घेतला जात होता. आता ईव्हीएम मतदारांनी मतदान कोणत्या पक्षाला केलं याचा पुरावा काय असावा समाजसेवक बाबा आढाव यांनी विचारला आहे.. तसेच सरकारकडून मोठी लूट सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली असून आत्मक्लेस उपोषण ते करत आहेत.
राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे आत्माकलेष उपोषण करत आहेत. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत महात्मा फुले वाड्यात त्यांनी आत्मक्लेश उपोषण सुरु केलं. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. याआधी छगन भुजबळ, रोहित पवार यांनी फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेतली. तर आज शरद पवार यांनी फुले वाड्यात जात बाबा आढाव यांची भेट घेत त्यांचं मत जाणून घेतलं. तसेच आमचा पूर्ण पाठिंबा असल्यासही जाहीर केलं.
निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं आहे, असं बाबा आढाव यांनी शरद पवारांना सांगितलं. तसंच ईव्हीएमवर शंका घ्यायला जागा आहे, असंही बाबा आढाव शरद पवारांना म्हणाले. त्यांच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले,लोकांमध्ये जाऊन जागृत केले पाहिजे यामध्ये लोकांनी सहभाग घेणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितलं.