राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात पारनेर विधानसभा मतदारसंघात नवा फंडा पाहायला मिळत आहे.. या मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांनी खासदार निलेश लंके यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.. नुकताच अहिल्यानगर तालुक्यातील अकोले नगर येथे आमदार दाते यांचा विजयाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी खासदार लंके यांना चांगलंच डिवचल आहे. यावेळी त्यांनी पाच वर्षापासून या मतदारसंघात सुरू असलेल्या दबंगिरीला नागरिक कंटाळले आहे. त्यामुळे ही दबंग गिरी आता सहन केली जाणार नाही ती फेकून दिली पाहिजे.. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशा पर्वतीच्या लोकांना गाडून टाका असं आवाहन करत त्यांनी खासदार लंके यांना डिवाचलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांना धोबीपछाड देत त्यांच्या पत्नी राणी लंके यांचा दारुण पराभव केला.. त्यांच्या या विजयानंतर त्यांच्या चांगलाच कॉन्फिडन्स वाढला असून या मतदारसंघात नवा बदल पाहायला मिळणार आहे.. त्यांनी आपल्या विजयात माजी खासदार सुजय विखे आणि शिवाजी कर्डिले यांचा मोठा वाटा असल्याचाही सांगितलं. हे सांगत असताना त्यांनीच पुन्हा एकदा लकेंवर निशाणा साधला.. या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात प्रसिद्धीचा नवीन फंडा झालाय दुखद घटनेची प्रसिद्धी केली जाते.. असे लोकप्रतिनिधी जन्माला आलेत असा टोला त्यांनी लगावला..
या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राणी लंके, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे काशिनाथ दाते आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे संदेश कारले यांच्या तिरंगी लढत झाली.. या लढतीत अजितदादांच्या काशिनाथ दाते यांनी दणदणीत विजय मिळवला. दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पारनेर मतदारसंघ आपल्याकडे ठेवत काशिनाथ यांना रिंगणात उतरलं होतं.. त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतली आणि विजयाचा वार फिरलं..
काशिनाथ दाते यांनी असेही म्हटले की, या मतदारसंघात लोकप्रतिनच्या दबंगिरीला युवक तरुण कंटाळले होते पाच वर्षात या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देतील.. असं कोणतेही काम त्यांनी केले नाही, त्यांना फक्त लंके प्रतिष्ठान राज्यात मोठं करायचं होतं अशी टीका देखील त्यांनी केली.