राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला.. महायुतीला सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली..मात्र या विजयानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याच्यां चर्चा सर्वत्र पसरल्या. तसेच विरोधकांकडून या योजनेवर जोरदार टीकाही करण्यात आली.. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून लाडक्या बहिणीचीं चिंता आता मिटली आहे..या काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा असं सांगत त्यांनी लाडक्या बहिणीमध्ये असणाऱ्या संभ्रमाचे वातावरण दूर केलं आहे.
महायुतीच्या विजयानंतर सरकारकडून पात्र लाभार्थ्यांचे अर्जामध्ये बदल करण्यात येणार आहेत.तसेच नवीन निकष करण्यातयेणार आहेत.. निवडक बहिणींनाच योजनेलाच लाभ मिळणार असल्याच म्हटलं जात होत. त्यामुळे लाडक्या बहिणीचे निकष बदलणार का अशी भीती लाडक्या बहिणीमध्ये पसरली होती. मात्र आता ही भीती आता दूर झाली असून लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याचे वेध लागल आहे. मात्र आता लाडक्या बहिणींना दीड हजार मिळणार की 2000 रुपये 100 याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते देण्यात आले आहेत. जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सहावा हप्ता कधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचही लक्ष लागला आहे. दरम्यान आज अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर या लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया दिली.. त्यांच्या या प्रतिक्रियेने लाडक्या बहिणीची चिंता मिटली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे 230 पेक्षा अधिक उमेदवारांचा विजय झाला. राज्यात महायुतीचं सरकार येण्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरली. जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गंत पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यात आले. लाडक्या बहिणींनी या योजनेची मतदानरुपी महायुतीला योग्य परतफेड करत पु्न्हा सत्तेत आणण्यात निर्णायक भूमिका बजावली.