राजमुद्रा : नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना अचानक राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.. एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या दरे या मुळं गावी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. त्यानंतरत्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे. त्यांच्या शरीराचे तापमान अधिक असून नुकतेच त्यांना सलाईन लावल्याचीं माहिती समोर आली.. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना नेमकं काय झालं याची माहिती दिली आहे.. त्यांना सर्दी झाल्यामुळे घशाला इन्फेक्शन झाला आहे.. व्हायरल संक्रमण त्यांना झालं असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडीत चांगला वेग आला.या घडामोडी दरम्यान शिवसेना नेते आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहितीच्या बैठकीसाठी दिल्लीला पोहोचले. बैठकीतून परतल्यानंतर साताऱ्यातील मूळ गावी गेले… गावी गेल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली.. त्यांच्या गावी चार डॉक्टरांशी पथक त्यांच्यावर उपचार करत असून तब्येतीत बरी सुधारणा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.. उद्या ते मुंबईला जाणार आहेत अशी माहिती त्यांचे फॅमिली डॉक्टर आर एम पार्टे यांनी दिली.
दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महायुतीची मुंबईत बैठक होणार होती ..मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली आणि ती बैठकी रद्द करावी लागली त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांनी सूर धरला… मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हा दावा फेटाळण्यात आला.. आता ते लवकरच मुंबईत उद्या येणार असून परत कामाला लागणार असल्याचे समोर आले आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला 132 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या.. आता या नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..