राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून काही अवधी उलटला तरीही नव्या सरकारचा शपथविधीला अजूनही विलंब होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.मात्र आता नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख समोर आली असून येत्या गुरुवारी म्हणजे 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे..तसेच या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती असणार आहे.त्यामुळे या नव्या सरकारमध्ये कोणाकोणाच्या नावाचीं वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसापासून या नव्या सरकारच्या शपथविधी बरोबरच मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अजूनही संपला नाही.. महायुतीत मुख्यमंत्री पदावरून असणारी रस्सीखेच पाहता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अजूनही कुठली घोषणा करण्यात आलेली नाही.. जाहीर करण्यात आली आहे.. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांमध्ये महायुतीची अशी एक महत्त्वाचीं बैठक होणार आहे.. या बैठकीपूर्वीच भाजपकडून मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर अडून बसल्यात अशा चर्चांनी जोर धरला आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने अधिक मत मिळवलं.. भाजपला 132 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या.. भाजपचा पारड अधिक जड असल्याने मुख्यमंत्री भाजपचाच असणार असं दिल्ली झालेल्या बैठकीत निश्चित मानले जात आहे.. मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण असणार यांची घोषणा केलेली नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.. आता या नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे..