राजमुद्रा : नुकतीच काल नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख समोर आली असताना अजूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदाचा आग्रह धरला आहे. तर शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद घेतलं तर उपमुख्यमंत्री कोण असेल? यावर चर्चा होत आहे. अशातच एकनाथ शिंदेंच्या गटातील नेत्याच्या नावाचे उपमुख्यमंत्रिपदासाठी पोस्टर लागले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे..छत्रपती संभाजीनगर मध्ये ठीक ठिकाणी संजय शिरसाट यांची भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत.. त्यामुळे महायुतीत चाललय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.. एकनाथ शिंदेंच्या ऐवजी संजय शिरसाट यांच बॅनर लागल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात सत्ता स्थापनेकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आता शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांच्या समर्थकांकडून भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर संजय शिरसाट यांच्यासाठी बॅनरबाजी करण्यात येत आहे. दिल्ली झालेल्या बैठकीनंतर संजय शिरसाठ यांनी काजू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसात मोठा निर्णय घेतला अशी घोषणा केली होती.. त्यानंतर आता संजय शिरसाट यांच्याच नावाच बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? गृहखातं कुणाकडे असणार? एकनाथ शिंदे हे उपमंत्रिपद स्वीकारणार का? हे प्रश्न मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात चर्चेत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट उपमुख्यमंत्रि असतील, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदेचे आपल्या साताऱ्यातील मूळ गावी गेले असून त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांच्यावर घरात उपचार सुरू आहेत.. आज ते मुंबईला येणार असल्याची माहिती समोर आली असून संध्याकाळी महायुतीची बैठक ही होणार आहे.या बैठकीत ते काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.