राजमुद्रा : नव्या सरकारच्या स्थापनेकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आता खानदेश मधील शिंदेसेनेचे मोठे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. त्यांनी ठाकरे गटाचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे.. ठाकरे गटातील दहा जण आमच्या संपर्कात असल्यास त्यांनी सांगत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले आहे.. त्यांच्या या दाव्याने ठाकरे गटात फूट पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
गेल्या काही दिवसापासून राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आला होता.. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले एकनाथ शिंदे साहेब नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही.. कारण नाराज हा त्यांच्या जीवनातला कधीच शब्द नाही.. असं त्यांनी म्हटलं.. दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या बाबत बोलताना शेवटी भाजपच्या नेतृत्वाचा विषय आहे असेही त्यांनी म्हटलं.. येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे मात्र त्याआधी दोन डिसेंबर रोजी भाजपच्या गट नेत्यांची निवड होईल असाही दावा करत त्यानंतर पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शपथ घेतील असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
खानदेशातील शिंदेसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.. उद्धव ठाकरे यांनी आता आता तरी महालाचा संपूर्ण सत्या नाश करणाऱ्या संजय राऊताला ओळखावे..त्यानी अजूनही नाही ओळखले तरी उरलेले वीस आहेत ना त्यांच्यातील दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. नव्या सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लाग