राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेची निवडणूक ठरली ती बारामती मतदारसंघाची. या मतदारसंघात आता फेर मतमोजणी होणार आहे.. या मतदारसंघातील पराभूत झालेले उमेदवार युगेंद्र पवार यांनी मोठं पाऊल उचलल आहे. या मतदारसंघात पाच टक्के ईव्हीएमची फेर मतमोजणी होणार आहे असं त्यांनी म्हटले आहे.. तसेच या निवडणुकीत आम्ही पराभूत झालो असलो तरी बारामतीकरांसाठी आम्ही काम करत आलो आहे. यापुढेही करत राहू, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार असं सामना रंगला.. या मतदारसंघात काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांची लढत चर्चेची ठरली. या लढतीत अजित पवार विजयी झाले. त्यानंतर काकाविरुद्ध पुतण्याने पुन्हा फेरमतमोजणीचा अर्ज दिला आहे. त्यासाठी लागणारी रक्कमसुद्धा भरली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पाच टक्के ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार आहे, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.आम्हाला सुप्रीम कोर्टाने 5 टक्के ईव्हीएम तपासायचा अधिकार दिला आहे. त्यानुसार आम्ही पडताळणीसाठी अर्ज करणार आहोत असं त्यांनी म्हटलं..
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर ईव्हीएम वर अधिक संशय घेत पुन्हा फिर तपासणी करण्याची चर्चा अधिक रंगू लागली.. दरम्यान पुणे जिल्ह्यातून ११ उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी ६६ लाख रुपये भरले आहेत. यासंदर्भात बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत फक्त माझाच पराभव झाला असता तर मी अर्ज केला नसता. कारण बारामतीमध्ये कोणी उभे राहण्यासाठी तयार नव्हते. आमच्या पुढची ताकद मोठी होती. आमच्या पुढे आव्हान मोठे होते. राज्याचे उपमुख्यमंत्री होते. परंतु आम्ही विचार सोडले नाही. त्यामुळे आम्ही लढलो. असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
बारामती मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.. या बालेकिल्ल्यात विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी दणदणीत विजय मिळवत युगेंद्र पवार यांचा पराभव केला. विधानसभेतील पराभव हा आघाडीच्या नेत्यांना जिव्हारी लागला असून त्यांच्याकडून परत फेर मतमोजणी करण्यास जोर धरला आहे.