राजमुद्रा : नव्या सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह किमान 15 ते २० जणांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित केलं असून त्यांच्यासोबत कोण कोण शपथ घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे
या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह १० ते १५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. तर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरूण आमदारांचाही समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह शपथ घेणाऱ्या भाजपच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि संजय कुटे यांचा समावेश आहे.
दरम्यान, महायुतीला शपथविधी सोहळा हा भव्य करायचा आहे. कारणं या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक लोकं या शपथ विधीसाठी उपस्थितीत राहू शकतात.