राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने बाजी मारत महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं. यानंतर घटक पक्ष असलेला राष्ट्रवादीचा शरद पवार गट जोमाने कामाला लागला असून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदाच्या निवडीबाबत बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ विधिमंडळ पक्ष नेता, गटनेता आणि मुख्य प्रतोदपदाची निवड करण्यात आली ही.पक्षाच्या गटनेतेपदी मुंब्रा- कळवा विधानसभा मतदारसंघाचे जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे. तर मुख्य प्रतोदपदी तासगाव- कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहित आर. आर. पाटील यांची निवड करण्यात आली आहे..
या बैठकीत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांना हरवत विजय मिळवणाऱ्या आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार पदी असणाऱ्या उत्तम जाणकर यांची प्रतोदपदी निवड झाली. राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कमी मतांवर समाधान मानावे लागले. यामध्येराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 उमेदवार निवडून आले. यापैकी नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबईतील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला या दहा उमेदवारांपैकी उमेदवार उपस्थित होते.
या बैठकीला नंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली. मुख्य प्रतोदपदी आर. आर. पाटील, प्रतोद म्हणून आमदार उत्तम जाणकर यांची निवड झाली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान दुसरीकडे नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना येत्या पाच डिसेंबरला कोण कोण शपथ घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.