राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात पारनेर विधानसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा दारुण पराभव झाला आणि या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे काशिनाथ दाते विजय झाले.. या निवडणुकीत झालेल्या पराभव खासदार निलेश लंके यांना चांगलाच जिव्हारी लागला असून त्यांनी विरोधकांना चांगलाच कडक इशारा दिला आहे. या निवडणुकीत काठावर पराभव झाला म्हणून निलेश लंके हा खचणारा माणूस नाही. एका रात्रीत सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून आम्हीही बसू शकतो.. एक महिन्याच्या कालावधीत एक गुड न्यूज देणार असा सूचक इशारा खासदार लंके यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी मेळावा घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र ही केल,, त्याने असेही म्हटले की या निवडणुकीत यांत्रिकरणांना घात केलाय.. प्रस्थापित आणि घराणेशाही विरोधात माझा उदय झाला आहे त्यामुळे संघर्ष मला नवा नाही,सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं सांगत त्यांनी समर्थकांचे कान टोचलं.एकमेकांमधील जिरवाजिरवीच राजकारण आता बंद करा असा सल्लाही त्यांनी समर्थकांना दिलाय.
या पारनेर मधील मतदार संघात आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके यांनी लोकसभा सदस्य म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्या सवयी त्यांच्या पत्नी राणी लंके या विधानसभेचे उमेदवार असतील त्यांनी निश्चित केलं होतं.. निवडणुकीच्या आखाड्यात मात्र त्यांना पराभवाला समोर जावं लागलं. नंतर खासदार निलेश लंके चांगलेच आक्रमक झाले असून पुन्हा ते जोमाने तयारीला लागले आहेत.