राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप ही महायुतीच सरकार स्थापन होऊ शकले नाही. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला असून महायुतीत उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पदावरून धुसफुस सुरू आहे.. आता महायुतीच्या तिन्ही नेत्यांचीं मुंबईत बैठक होणार असून या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.. या बैठकीत तरी गृहमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाबाबतचा तिला सुटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगावी गेल्यानंतर आजारी पडले. त्यानंतर ती आता मुंबईत परतले असून लवकरच महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदें यांची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही गृहमंत्री पदावर अडून बसले आहेत.. त्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधीचा घोळ कायम असल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाला तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. बहुमत मिळालं तर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केले आहेत.. आता या मुंबईतील बैठकीनंतर मिळालेल्या माहितीनुसार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व अजित पवार आज पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.. त्यामुळे महायुतीमधील तिढा सुटणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे. या नव्या सरकारमध्ये कोण कोण शपथ घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.