राजमुद्रा : नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना महायुतीतील सत्ता स्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाही.. महायुतीत उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पदाचा तिढा अजून असून या पार्श्वभूमीवर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. मात्र भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे. त्याउलट एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रीपद या दोन्हीही पदांवर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीतील हा तिढा सुटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिल्ली दरबारी झालेल्या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या मूळ गावी गेले.. त्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला.. त्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत.. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका आजच्या रद्द करण्यात आले आहेत.दरम्यान काल संध्याकाळी ते मुंबईत परतले. यानंतर आज एकनाथ शिंदे अनेक बैठकांना हजेरी लावतील असे सांगितले जात होते. मात्र सध्या एकनाथ शिंदेंची प्रकृती ठिक नसल्याने ते विश्रांती घेत आहे.
एकनाथ शिंदे यांनी अचानक बैठका रद्द केल्याने महायुतीच्या आज होणाऱ्या बैठका कशा पार पडणार, गृहमंत्रिपदाचा तिढा सुटणार का? शिंदे गट फक्त उपमुख्यमंत्रीपदावर समाधानी होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. त्यामुळे आता सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.