राजमुद्रा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांना याआधी पुण्यातील विशेष न्यायालयात दोन वेळा समन्स बजावल्यानंतर त्यांनी गैरहजेरी दाखवली.. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात वकील संग्राम कोलटकर यांनी पुणे कोर्टात गैरजमानातील अटक वॉरंट काढण्याची मागणी केली आहे.. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.. आता पुन्हा एकदा त्यांना हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर ते कोर्टात हजर राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात बदनामी खटला दाखल झाला आहे. त्यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीस हजर राहण्याचे समन्स राहुल गांधी यांना बजावण्यात आला होते. मात्र ते हजर राहिले नाही. आता पुढील सुनावणी ही १० जानेवारी होणार आहे. त्यांच्या गैरहजर प्रकरणी आता वकील संग्राम कोलटकर यांनी अटक वॉरंट करण्याची मागणी केली आहे.अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले की, पुढील तारखेला राहुल गांधी हजर राहतील असे सागितले आहे. परंतु त्यालाही आम्ही आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांना दोन वेळा समन्स बजावले होते. आता परत न्यायालयात उपस्थितीत राहिले नाही तर न्यायालय कठोर कारवाई करेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
दरम्यान राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. सध्या संसदेचे सत्र सुरू आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणी हजर राहता येत नाही, असा युक्तीवाद राहुल गांधी यांच्या वकिलांनी कोर्टात केला. आता यावर पुणे कोर्ट काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..