राजमुद्रा : नव्या सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार असून महायुतीत खाते वाटपावरून धुसफुस सुरू आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर अडून बसले आहेत.. महायुतीत उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.. अशातच आता. भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीश महाजन महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीत राजकीय विषयावर चर्चा होते का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले आहेत.. शिंदे यांना गेल्या दोन दिवसांपासून बरं नसल्याची माहिती आहे. ते दोन दिवस त्यांच्या साताऱ्यातील दरेगावात मुक्कामी होते. तिथे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतले. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले होते. पण त्यांची पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांची शिवसेना नेत्यांसोबतची आजची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींदरम्यान गेल्या दोन-तीन दिवसात एकाही भाजप नेत्याने शिंदेंची भेट घेतली नव्हती. यानंतर आज गिरीश महाजन हे भेट घेणारे भाजपचे पहिले नेते आहेत.
दरम्यान राजाचे काजू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या भेटीत काही राजकीय विषयांवर चर्चा होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच भाजपचे संकट मोचक सत्ता स्थापनेचा तिढा सोडवणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.