राजमुद्रा : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला असून येत्या पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अशातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाना उद्याण आलं आहे.. अशातच भाजपचे संकट मोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद तास चर्चा झाल्यानंतर युतीमध्ये सर्व आलबेल आहे. सर्व व्यवस्थित आहे. आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया महाजनांनी माध्यमांना दिली.
साताऱ्यातील मुळगावी गेल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक तब्येत बिघडली.. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिल्यानुसार त्यांनी विश्रांती घेतली.. त्या विश्रांतीनंतर परत ठाण्यात परतले.. मात्र त्यांनी तब्येत ठीक नसल्याने सर्व बैठका रद्द केल्या… ठाण्यात आल्यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली.. या भेटीनंतर ते म्हणाले, आमची 5 तारखेची तयारी सुरु आहे”,. “मला असं वाटतं की, त्यांची उद्या तब्येत सुधारल्यानंतर ते बैठक घेणार आहेत. ते शासकीय बैठक घेण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून ज्या गोष्टी बाहेर येत आहेत तसे कोणतेही मतभेद आमच्यात नाहीत”, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर अडून बसल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना माझी गृहमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्याबाबतीत आम्ही एक शब्दही बोललो नाही. कोणतं खातं कुणाला पाहिजे, याबाबत आमच्यात चर्चा झालेली नाही असं स्पष्ट महाजन यांनी सांगितलं.
महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चा होत असतात मात्र आमच्यात कुठेही दुरावा नाही. तुम्हाला आम्ही सर्व एकत्र दिसू. आमच्या 5 तारखेचा शपथविधीचा कार्यक्रम अतिशय दिमाखदार होईल. आमच्यात कोणतंही मतमतांतर नाही”, असं गिरीश