राजमुद्रा : महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आला असून महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे.. अशातच राज्याचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्याने विरोधकांकडून तर्कवितर्क लावली जात आहेत.. एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नसल्याने त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज आहे. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक सुरू आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
दिल्ली दरबारी जाऊन आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील दरे या गावी गेले. यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. चार डॉक्टरांच पथक त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला.. मात्र काल ते पुन्हा ठाण्यात परतले.. अजूनही त्यांची प्रकृती ठीक नाही.. आता जुपिटर हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.. त्यांचा डेंगू चा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून अशक्तपणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना पुन्हा आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनीं दिला आहे.
नव्या सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार असून सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.. शपथविधीची तयारी तोंडावर असताना एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे.. दरम्यान आता त्यांना पाहण्यासाठी शिवसेना नेते आणि आमदार ठाण्यात येत आहेत.. यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरात, शिवसेनेला नेते भरत गोगावले हे देखील त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत..