राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला अधिक बहुमत मिळालं अनु महाविकास आघाडीचा पराभव झाला.. आता आघाडीतील एकाही पक्षाकडे विरोधीपक्ष नेतेपदाची खुर्ची मिळण्याइतके संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधकांशी जागा खाण्याची महायुतीची तयारी सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत… अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होणार का? असा प्रश्न दमानियांनी उपस्थित केला आहे.या पाठीमागे भाजपचं षडयंत्र आहे का असेही त्यांनी म्हटले आहे..
राजाचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेते पदावर बसून विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कट असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.. सत्ता पण आमची आणि विरोधी पक्ष पण आमचाच असल्याचा कट भाजपाकडून रचला जात आहे..भाजपला समर्थन देणारे एकनाथ शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है, असं अंजली दमानिया म्हणतात. त्यांच्या या पोस्टने राजकीय वर्तुळत चर्चाना उधाण आला आहे.या पोस्टमध्ये त्यांनी पुढे हॉरिबल राजकारण असा हॅशटॅगही त्यांनी दिला आहे.
दरम्यान दुसरीकडे महायुती सरकारकडून नव्या सरकारच्या शपथविधीची जयत तयारी सुरू आहे. नव्या सरकार मध्ये मुख्यमंत्र्यांसह 20 शपथ घेणार आहेत. दरम्यान राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत..
दरम्यान भारतीय जनता पक्षाने बुधवारी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी आमदारांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत विधिमंडळ नेता, अर्थात मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी भाजपने निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची नियुक्ती सोमवारी जाहीर केली. अशी माहिती समोर आली आहे.