राजमुद्रा : नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या पाच डिसेंबरला होणार असून महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिलेला प्रचंड जनादेश स्वीकारून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे…5 डिसेंबर रोजी महायुती भव्य शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून सरकार स्थापन करत असून, आझाद मैदान येथे नियोजित या शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला असून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष . चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रविण दरेकर, आ. संजय शिरसाट, आ. गुलाबराव पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. धनंजय मुंडे ,आ. अनिल पाटील उपस्थित होते.
या नव्या सरकारच्या शपथविधी मध्ये मुख्यमंत्र्यांसह वीस जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.. त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..