राजमुद्रा : नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता ही राजकीय वर्तुळात शिगेला पोचली होती. अशातच आता भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचेच नाव भाजप कडून मुख्यमंत्री पदासाठी निश्चित मानले जात आहे.
आज सकाळीच भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची भाजपचा विधिमंडळात गटनेतेपदी निवड करण्यात आली.. यावेळी भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.. त्यानंतर आमदारांच्या बैठकीत बहुमताने फडणवीस यांचे नाव निश्चित केले.. त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आला..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला अधिक बहुमत मिळाले.. यामध्ये भाजपने 132 एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने 41 जागा जिंकल्या.. या निकालात भाजपचं पारड अधिक जड होतं.. दरम्यान आता उद्या होणाऱ्या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून महायुतीकडून या शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहे..