राजमुद्रा : महायुती सरकारच्या उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना उद्या आझाद मैदानावर केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतर मंत्र्यांचा शपथविधी देखील लवकरच पार पडणार आहे..या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आल आहे. या सोहळ्याला त्यांचीही उपस्थिती असणार आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहिणीच्या साक्षीनेही नव्या सरकारचा उद्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान मुंबई दौऱ्यावर असणारे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कमी कालावधीचा आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाली आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
आझाद मैदानावर महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरदार सुरू आहे. 30 हजार पेक्षा जास्त नागरिक बसतील. एवढा मोठा मंडप याठिकाणी बांधण्यात येत आहे. आझाद मैदानावर 100 बाय 100 चं मुख्य स्टेज उभारण्यात येत आहे. त्याच्या बाजूला दोन स्टेज बांधण्यात येत आहे. संपूर्ण स्टेज आणि मंडप भगवंमय करण्यात येत आहे. अतिशय मजबूत असा मंडप बांधण्यात येत आहे.. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याकडे सर्वांच्या नजर लागली आहेत.
या सोहळ्यासाठी विशेष म्हणजे महायुतीला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी शपथविधीच्या ठिकाणी “लाडकी बहीण कक्ष “उभारण्यात येणार असून दहा हजार महिलांची व्यवस्था केली जाणार आहे..