राजमुद्रा : नव्या सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू असताना नुकतीच विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक मताने निवड झाली.. ही निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.. तसेच त्यांनी सर्व नेत्यांचे, वरिष्ठांचे आभार मानले..तसेच भाजपच्या नवनियुक्त आमदारांना सूचक सल्ला दिला..तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी नसतो. त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तुमच्या सहकार्याने आणि कौलाने आपलं महायुतीचं सरकार आलं . या सरकारमध्ये आपण आपल्या सर्व मित्रांना एक दिलाने सर्वांना सोबत घेऊन काम करू . एवढा मोठा कौल असल्यावर सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाही. असेही ते म्हणाले… येत्या काळात चार गोष्टी मनासारख्या होतील. तर चार गोष्टी मनाविरुद्धही होतील. लार्जर इंट्रेस्टमध्ये काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ, असेही सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी केले.
नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना उद्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. आज त्यांची भाजपच्या गटनेतेपदी आज निवड करण्यात आली. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील..त्यामुळे उद्या होणारे या ऐतिहासिक सोहळ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १३२ आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 राष्ट्रवादीचे अजित पवार गटाला 41 मिळाल्या.. दरम्यान आज विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, .मी बुथचा कार्यकर्ता म्हणून, वॉर्डाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. अशा व्यक्तीला तीन वेळा मुख्यमंत्रीपदावर बसवलं. एकदा ७२ तासांसाठी होतो. पण टेक्निकली मुख्यमंत्री होतो. हा पक्ष मोठा झाला. त्यांनी संधी दिली. मी मोदींचं आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.