राजमुद्रा : महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला असून उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.. असं असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तब्बल दोन दिवस रजनी दिल्ली येथे तळ ठोकून बसले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी ते गेले होते… मात्र दोन दिवस दिल्लीत तळ ठोकूनही अजित पवारांची पदरी निराशाच आली आहे. ‘ती’ महत्वपूर्ण भेट झालेलीच नाही. त्यामुळे अजित पवार आता मुंबईसाठी रवाना झाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दोन दिवस दिल्लीत मुक्काम करूनही मंत्री अमित शाह यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे अखेर अजित पवारांना परत मुंबईकडे फिरावं लागलं आहे. दोन दिवस तळ ठोकून दिल्लीत थांबूनही अजित पवारांना अमित शाह यांच्या सोबतच्या भेटीसाठीचा वेळ मिळालेला नाही.जादा मंत्रिपदांसाठी आणि इतर चर्चा करण्यासाठी ही भेट होणार होती..शपथविधी तोंडावर असतानाच शाह यांची भेट न घेता अजित पवार मुंबईला रवाना झाले आहेत.
दरम्यान शपथविधीची तयारी सुरू असताना आज दुपारी महायुतीचे तीन पक्ष सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर जाणार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन नेत्यांची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक होणार आहे. त्यासाठी अजित पवार दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..