राजमुद्रा : आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली.. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.. त्यामुळे उद्या होणारा शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं.या सगळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ही महत्वाची मानली जात आहे. भाजप आणि महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी बसावं, अशी फक्त भाजप कार्यकर्त्यांची इच्छा नव्हती, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही त्याच भूमिकेत असल्याची माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने असेही म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत .त्यांनी नेहमीच राजकीय आचरणातही संघाच्या शिस्तीचे पालन केले आहे.. ते नागपूरचे असल्याने संघाच्या सर्वच पातळ्यांवर त्यांचा थेट डायलॉग नेहमीच राहिला आहे…महाराष्ट्रात विकास, हिंदुत्वाचा विचार आणि सर्व समाजांना सोबत घेऊन सरकार चालवण्याची क्षमता फडणवीस एवढी इतर कोणांमध्येही नाही.. असेही त्यांनी म्हटले आहे.
महायुतीतील भाजपने आज अखेर मुख्यमंत्री पदाचं आणि विधीमंडळाच्या नेतेपदाची एकमताने निवड केली..देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे..उद्या (गुरूवारी) 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहणार आहेत.