राजमुद्रा : नव्या सरकारच्या शपथविधीच्या तोंडावर भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी एकत्रितपणे राजभवनात जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर या तीनही प्रमुख नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात रहावं अशी विनंती देखील केली.त्यांच्या या वक्तव्याने एकनाथ शिंदे हे महायुतीच्या मंत्रिमंडळात असतील की नाही? याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. आता एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेता पदी नियुक्ती झाली.. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच ही निश्चित झालं. दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावं . त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे”, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. याबाबत एकनाथ शिंदे यांना माध्यमाने प्रश्न विचारला असता.. त्यावर त्यांनी आपली भूमिका संध्याकाळी जाहीर करतो असं स्पष्ट सांगितलं.
याबाबत बोलताना पुढे ते म्हणाले, मी मंत्रीमंडळात राहावं ही सर्व माझ्या आमदारांची इच्छा आहे मात्र. देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले. त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आमचे सर्व महायुतीच्या आमदारांचादेखील जो आग्रह आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचा आदर करतो”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली. आता संध्याकाळी ते यावर आणखी काय उत्तर देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान उद्या आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे.. तसेच इतर मंत्र्यांचा शपथविधी ही लवकरच पार पडणार आहे.. त्यामुळे उद्या होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.