राजमुद्रा : महायुती सरकारच्या आज होणाऱ्या ऐतिहासिक भव्य शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.. आज फक्त या ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोचली आहे..
आझाद मैदानावर महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्याची तयारी झाली असून 30 हजार पेक्षा जास्त नागरिक बसतील इतकी व्यवस्था केली आहे. एवढा मोठा मंडप याठिकाणी बांधण्यात आला आहे. आझाद मैदानावर 100 बाय 100 चं मुख्य स्टेज उभारण्यात येत आहे. त्याच्या बाजूला दोन स्टेज बांधण्यात आले आहेत..संपूर्ण स्टेज आणि मंडप भगवामय करण्यात आला आहे. अतिशय मजबूत असा मंडप बांधण्यात येत आहे.. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याकडे सर्वांच्या नजर लागली आहेत.. दरम्यान इतर मंत्र्यांचा शपथविधी लवकरच होणार असल्याची माहितीही समोर आली आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहिणीच्या साक्षीनेही नव्या सरकारचा उद्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान आज फक्त तिघांचाच शपथविधी होणार आहे. शपथविधी सोहळ्याला काही तास उरले असताना अजित पवार यांनी एक मोठ स्टेटमेंट केलं आहे. कालपासून फक्त तीन नेत्यांचा शपथविधी होणार की अन्य मंत्र्यांचा सुद्धा अशी चर्चा रंगली आहे. मात्र आता इतर मंत्र्यांचा शपथविधी लांबणीवर पडला का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे..