राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी पुण्यात काही तास शिल्लक असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानांन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.. असंच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.. या पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्याचा दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.. काळजीवाहू मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत मात्र गृह खाते शिंदे साहेबांनाच मिळाव अशी आमची आजची मागणी आहे असे त्यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची शपथविधी समारंभाची गुलाबी पत्रिका व्हायरल झाली आहे.. या पत्रिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे मात्र एकनाथ शिंदे यांचा नाव दिसत नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उद्याण आलं आहे. या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्यामुळे ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले. शपथ घेण्यास पत्र घेऊन ते राजभावनावर जाणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
आज सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आता समोर आली आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला अधिक मत मिळालं.. तर महाविकास आघाडीचा पराभव झाला.. या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.. भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित झालं..आता अवघ्या काही तासावरच राहिलेल्या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..